![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची घाई सुरू असताना, शिवसेना ठाकरे गटासमोर दक्षिण मुंबईतील मराठी बहुल प्रभागांमध्ये उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान होते. विशेषतः वॉर्ड क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरो
.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नुकतीच 75 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, त्या यादीत किशोरी पेडणकेरांचे नाव नसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज सायंकाळी पक्षाकडून किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली.
वॉर्ड क्रमांक 199 मध्ये पेडणेकर, तर 198 मध्ये खाड्ये
किशोरी पेडणेकर या वॉर्ड क्रमांक 199 चे प्रतिनिधित्व करतात आणि याच प्रभागातून निवडून येत त्या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. मात्र, याच भागात गेली 35 वर्षे कार्यरत असलेले शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी अबोली खाड्ये यांनीही यंदा याच जागेवर हक्क सांगितला होता. हा पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांना त्यांच्या मूळ प्रभाग 199 मधून, तर अबोली खाड्ये यांना शेजारील प्रभाग 198 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. अबोली खाड्ये यांच्या उमेदवारीला ‘निष्ठेचे फळ’ म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय, प्रभाग 196 मधून आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली – पेडणकेर
एबी फॉर्म मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये मी काम केले आणि अभिमानाने ते मतदारांना सांगू. जनतेने त्यांचा आशीर्वाद कायम ठेवावा. कोरोनाच्या संकटात सगळ्या जगाचे लक्ष आपल्या महापालिकेकडे होते. आम्ही सज्ज आहोत, आम्ही जागृत आहोत, असे पेडणकेर म्हणाल्या. माझ्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका नव्हती. काही वॉर्ड सेन्सिटिव्ह असतात, उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. आताही मला टेन्शन आहे, फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे, असेही त्यांनी म्हटले.
कोण आहेत अबोली गोपाळ खाड्ये?
बोली खाड्ये या लोअर परेल आणि करी रोड भागातील कट्टर शिवसैनिक व शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी आहेत. गोपाळ खाड्ये गेल्या 35 वर्षांपासून जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरही गोपाळ खाड्ये यांनी डगमगून न जाता उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा कायम ठेवली. प्रभाग 199 महिलेसाठी राखीव झाल्याने, गोपाळ खाड्ये यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्या पत्नीला संधी दिली आहे.
उमेदवारीसाठी चुरस आणि ठाकरेंचा कस
दादर, माहीम, लालबाग-परळ आणि वरळी यांसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांची मोठी रांग लागली होती. गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर अखेर आज एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. फोडाफोडीच्या राजकारणात जे पदाधिकारी पक्षासोबत ठामपणे राहिले, त्यांना प्राधान्य देण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी राबवल्याचे दिसून आले.
