Nanded Honor Killing Shock Mother Girlfriend Protest Attempt Self Immolation Demand Justice Question Police Action Highlight Accused Social Media Access | सक्षम ताटे हत्या प्रकरण: आई आणि प्रेयसीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह – Nanded News



जातीयवादातून झालेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, आज नांदेडमध्ये एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली. सक्षमला न्याय मिळावा आणि या प्रकरणात सामील असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठ

.

सक्षम ताटे हत्या प्रकरणात नांदेड पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अटकेत असतानाही मुख्य आरोपींपैकी एकाचे इन्स्टाग्राम अकाउंट चक्क ‘लाईव्ह’ असल्याचे समोर आले आहे. ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) या नावाने असलेल्या या अकाउंटवर आरोपीचे बेड्या घातलेले आणि पोलिसांसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. आरोपीला पोलिस कोठडीत असतानाही सोशल मीडिया वापरण्याची मुभा कशी मिळते? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, दोन दोषी पोलिसांना तात्काळ सहआरोपी करून अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांचे 2022 पासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम हा ‘आंबेडकरवादी बौद्ध’ तर आंचल ‘पद्मशाली हिंदू’ कुटुंबातील असल्याने आंचलच्या घरच्यांचा या विवाहास तीव्र विरोध होता. सुरुवातीला सक्षमवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आंचलने 18 वर्षे पूर्ण झाल्यावर स्वतःहून हे प्रकरण मागे घेण्याची तयारी दर्शवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मामिडवार कुटुंबाने सक्षमला ‘हिंदू धर्म’ स्वीकारल्यास लग्नास मान्यता देऊ, असे आमिष दाखवले होते. सक्षमने आंचलसाठी ही अट मान्य केली, परंतु हा केवळ त्याला जाळ्यात ओढण्याचा एक कट असल्याचे त्याच्या हत्येनंतर स्पष्ट झाले आहे.

आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. सक्षमच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी घेतला आहे. एका बाजूला आरोपींचे जेलमधील उदात्तीकरण आणि दुसरीकडे पीडित कुटुंबाची न्यायासाठी चाललेली धडपड, यामुळे नांदेडमधील वातावरण सध्या तापलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *