![]()
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आज पक्षाच्या 40 अधिकृत ‘स्टार प्रचारकांची’ यादी जाहीर केली आहे. या यादीत अनुभवी ज्येष्ठ नेत्यांसह, तरुण खासदार आणि बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा यांचाही समावेश असल्याने निवडणुकीत मोठा राजकीय आणि ग्लॅमरस
.
प्रचाराची धुरा स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील महत्त्वाचे चेहरे जसे की गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि संजय राठोड हे देखील प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आक्रमक भाषणांसाठी ओळखले जाणारे प्रवक्ते संजय शिरसाट आणि भरतशेठ गोगावले यांनाही मैदानात उतरवण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महानगरपालिका काबीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे 40 ‘शिलेदार’ मैदानात उतरवले असून, आता ‘मशाल’ आणि ‘इंजिन’च्या नव्या युतीसमोर शिंदेंचे हे स्टार प्रचारक किती प्रभावी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1. एकनाथजी शिंदे, मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री 2. रामदास कदम, नेते 3. आनंदराव अडसूळ, नेते 4. गजानन कीर्तीकर, नेते 5. डॉ कांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते 6. प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री 7. डॉ निलमताई गो-हे, नेत्या 8. सौ मिनाताई कांबळी, नेत्या 9. गुलाबराव पाटील, नेते व मंत्री 10. दादाजी भुसे, उपनेते व मंत्री 11. उदय सामंत, उपनेते व मंत्री 12. शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री 13. संजय राठोड, मंत्री 14. संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री 15. भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री 16. प्रकाश आबिटकर, मंत्री 17. प्रताप सरनाईक, मंत्री 18. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री 19. योगेश कदम, राज्यमंत्री 20. दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार 21. रंग बारणे, उपनेते व खासदार 22. धैर्यशील माने, खासदार 23. संदीपान भुमरे, खासदार 24. नरेश म्हस्के, खासदार 25. रवींद्र वायकर, खासदार 26. मिलिंद देवरा, खासदार 27. डॉ दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री 28. शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार 29. राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार 30. डॉ मनिषा कायंदे, सचिव व आमदार 31. निलेश राणे, आमदार 32. संजय निरुपम, प्रवक्ते 33. राजू वाघमारे, प्रवक्ते 34. डॉ ज्योती वाघमारे, प्रवक्ते 35. पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष 36. राहुल लोंढे, युवसेना सचिव 37. अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना 38. समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग 39. मती शायना एनसी, राष्ट्रीय प्रवक्त्या 40. गोविंदा अहुजा, माजी खासदार
