राष्ट्रवादी शरद पवार गटाची 22 जागांची खेळी: काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंकडे कल, सिल्व्हर ओकमधील बैठक ठरणार निर्णायक – Mumbai News

मुंबई महापालिका निवडणूक 2026 जवळ येत असताना राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मुंबईतील राजकीय डावपेच नव्याने आखण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे

.

ही बैठक खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असून, मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौकटीत पक्षाला किती जागा मिळाव्यात, याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष राखी जाधव यांच्याकडून पक्षाचा अधिकृत प्रस्ताव या बैठकीत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, रविवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार असल्याने, त्याआधीच राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ही बैठक केवळ अंतर्गत स्वरूपाची नसून, आगामी राजकीय वाटाघाटींसाठीची तयारी मानली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या मुंबई महापालिकेसाठी 22 जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी यापेक्षा अधिक जागांची मागणी करण्याच्या भूमिकेत आहेत. काही नेत्यांनी किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यानुसार जागांची संख्या वाढवण्याचा आग्रह धरला जात आहे. इतकेच नव्हे तर, काही आक्रमक नेत्यांकडून 50 जागांची मागणी करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. तथापि, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागांवर लढून जास्त यश मिळवण्याचा म्हणजेच स्ट्राइक रेट वाढवण्याचा पक्षाचा धोरणात्मक विचार असल्याचेही बोलले जात आहे.

पक्षातील कल हा स्पष्टपणे उद्धवसेना आणि मनसेसोबत जाण्याकडे

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अंतर्गत बैठकीत काँग्रेससोबत युती करण्याबाबत काहीशी साशंकता व्यक्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवण्यास अधिक पसंती दर्शवली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्ष बैठकीतही कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंशी जवळीक साधण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मुंबई युथ विंगचे अध्यक्ष अमोल मातेले यांनीही याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेसकडून युतीबाबत विचारणा होत असली तरी, पक्षातील कल हा स्पष्टपणे उद्धवसेना आणि मनसेसोबत जाण्याकडे झुकलेला आहे.

किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीचा अनुभवही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रणनीतीत महत्त्वाचा ठरणार आहे. त्या निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते. सध्या पक्षाचा दावा आहे की, मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये राष्ट्रवादीची पकड तुलनेने मजबूत आहे. याच ताकदीच्या आधारावर आगामी महापालिका निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. आजच्या बैठकीत केवळ जागावाटपच नव्हे, तर संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्न, उमेदवारांची निवड आणि युतीचे अंतिम स्वरूप यावर सखोल चर्चा होणार आहे. विशेषतः उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे नेमकी किती जागांची मागणी केली जाणार, यावरच पुढील राजकीय गणित ठरणार असल्याने, येत्या एक-दोन दिवसांत याबाबत मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *