अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वजिराबाद पोलिसांनी सलग दोन प्रभावी कारवाया करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टाटा 407 टेम्पो जप्त केले. या कारवाईत अंदाजे ₹7 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत गुन्हा क्र. 372/2026 अंतर्गत महावीर चौक परिसरात विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा टाटा 407 (क्रमांक MH-43-AD-1059) पकडण्यात आला. या प्रकरणी चालक आकाश संजय माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच गौण खनिज अधिनियम कलम 47(7)(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत गुन्हा क्र. 373/2026 अंतर्गत 18 जुलै रोजी हस्पापूर रोडवरील शाईन फंक्शन हॉलसमोर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा टाटा 407 (क्रमांक MH-04-FJ-3115) जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक शेख अमजद शेख रहीम व वाहन मालक दिलीप बापूराव माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये मिळून दोन टेम्पो व अंदाजे 2.5 ब्रास वाळूसह एकूण ₹7.07 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक अजित कुंभार,पोलीस उप निरीक्षक सुनील बुलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार. हबीब चाऊस,  विलास कदम, शिवसांब मठपती, गणेश धुमाळ, गुरुदीप सरदार, भाऊसाहेब राठोड, संतोष पोकळे, संतोष पावडे, ज्वालासिंग बावरी, इम्रान पठाण तसेच डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन अथवा वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *