बॉलिवूड गाजवायला अभिनेता आदिनाथ कोठारे सज्ज!:16 ऑक्टोबरला रिलीज होणार 'नई नवेली'; यामी गौतम सोबत मुख्य भूमिकेत झळकणार

मनोरंजन




नॅशनल पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे हा कायम बहुआयामी व्यक्तिरेखा साकारताना दिसतो मराठी सोबत बॉलिवूडमध्ये आपल्या कामाचं सातत्य जपत तो अजून एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. हॉरर, कॉमेडी फैमिली ड्रामा यांचा मिलाफ असलेल्या नई नवेली मध्ये आदिनाथ मुख्य भूमिका साकारताना दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आदिनाथ आणि यामी गौतम ही फ्रेश जोडी या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ट्रेलर मध्ये अगदी पहिल्या फ्रेम पासून आदिनाथचा रुबाबदार पण तितकाच खास अंदाज बघायला मिळतोय. रामायण पाठोपाठ अजून एक बॉलिवूड चित्रपट आदिनाथ करत असून दोन वेगळ्या भूमिका आणि दोन वेगळे विषय तो उलगडताना बघायला मिळणार आहे. अवस्थी कुटुंब आणि त्यांची ही हॉरर कॉमेडी बघण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत. आदिनाथच्या अभिनयातील वेगवेगळे पैलू कायम प्रेक्षकांनी अनुभवले आहेत पण नई नवेली मधला त्याचा अंदाज हा नक्कीच खास असणार यात शंका नाही. वैविध्यपूर्ण कथा,भूमिका आणि त्यांची योग्य निवड करून काम करण्याकडे कायम आदिनाथचा कल असतो हे यातून स्पष्ट होत. चित्रपट निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, बालाजी मोहन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर कथा हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ थेट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. बॉलिवूड मधला आदिनाथचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद असून नई नवेली सोबत दिवाळीच्या मुहूर्तावर तो रामायण मध्ये देखील दिसणार आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *