![]()
वसमत पालिका निवडणुक व हिंगोलीतील दोन प्रभागातील मतदानावर कडाक्याच्या थंडीचा चांगलाच परिणाम जाणावला. शनिवारी ता. २० पहिल्या दोन तासात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वसमतमध्ये ९ टक्के तर हिंगोलीत पाच टक्के मतदान झाले होते. वसमत व हिंगोलीत प्रत्येकी एका मतदान
.
वसमत पालिकेच्या नगराध्यक्षपद व १५ प्रभागातील ३० नगरसेवकांच्या जागेसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून ७२ मतदान केंद्रावर मतदानाला सुरवात झाली आहे. तर हिंगोलीत प्रभाग क्रमांक पाच ब व प्रभाग क्रमांक ११ ब या दोन प्रभागातही मतदान प्रक्रिया सुुरु झाली. मात्र आज कडाक्याची थंडी असल्यामुळे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी झालीच नाही.
दरम्यान, वसमत येथे सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ ९ टक्के मतदान झाले. ५९ हजार मतदारांपैकी ५४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर हिंगोलीत दोन्ही प्रभागांमध्ये मिळून ५ टक्के मतदान झाले आहे. वसमत येथील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्राचे बटन योग्य पध्दतीने दबत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदान यंत्र बदलण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले. तर हिंगोली येथील प्रभाग क्रमांक ५ मधील केंद्र क्रमांक सहा मध्ये मतदान यंत्राच्या बटण दबत नसल्याने या ठिकाणीही उमेदवारांच्या समक्ष मॉकपोल घेऊन मतदान यंत्र बदलण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी सांगितले.
