तरोडा नाका, भावसार चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाची मागणी   लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त


नांदेड (प्रतिनिधी) – तरोडा नाका ते भावसार चौक हा नांदेड शहरातील सर्वात मोठा आणि वर्दळीचा बाजारपेठेचा भाग आहे. येथे भाजीपाला बाजारासह विविध प्रकारच्या दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील 10 ते 15 खेड्यांतील नागरिक दररोज खरेदीसाठी येथे येत असतात.

मात्र, एवढी मोठी वर्दळ असतानाही या संपूर्ण भागात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने व्यापारी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या भागातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे प्लॉटधारकांनी रिकामी जागा देखील बाउंड्री करून घेतली आहे. जर कोणाला शौचालयासाठी जायचे असेल तर भाग्यनगर पोलीस स्टेशनजवळील मनपाचे शौचालय हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी 1 ते 2 किमी अंतर पायी कापावे लागते. छोट्या व्यापाऱ्यांना स्वतःचे दुकान बंद करून एवढ्या लांब जावे लागते. त्यामुळे ग्राहक आणि वेळ दोन्हीचे नुकसान होते. या भागातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की, तरोडा नाका किंवा भावसार चौक येथे तातडीने सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे. स्थानिक नगरसेवक आणि आमदारांनी या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील व्यापाऱ्यांनी केला आहे.

महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी ही अत्यंत मूलभूत गरज आहे. प्रशासनाने यात पुढाकार घेऊन तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे


Post Views: 9






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *