अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास


अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या अर्धापूर येथील घरात प्रवेश करून घरातील ३५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सुरेश लालाजी गरुड (वय ३५, रा. देठ, ता. अर्धापूर) यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(अ) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार वाटे करीत आहेत.


Post Views: 301






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *