Taking Wangchuk to government hospital is not arbitrary


  • Marathi News
  • National
  • Taking Wangchuk To Government Hospital Is Not Arbitrary High Court, CJP’s ‘Sansad Chalo’ March Today, But No Permission From Delhi Police

नवी दिल्ली40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सोमवारी संसद भवनापर्यंत मार्च काढणार आहे. सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या या मार्चमध्ये सहभागाबाबत अनिश्चितता आहे. मात्र त्यांची पत्नी डॉ. गीतांजली जे. आंग्मो यांनी म्हटले की, त्या मार्चमध्ये वांगचुक यांचे प्रतिनिधित्व करतील. दरम्यान, रविवारी दिल्ली हायकोर्टाने गीतांजली यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

गीतांजलींनी वांगचुक यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ठेवण्याला आव्हान दिले होते. त्यांनी तिथून तात्काळ डिस्चार्ज देऊन मेदांता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने म्हटले, ‘वांगचुक कोठडीत नाहीत. सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही. उपचारात वांगचुक यांनी डॉक्टरांना सहकार्य करावे. ’ यानंतर गीतांजली यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत सोमवारी सुनावणीची मागणी केली.

हेल्थ बुलेटिन : वांगचुक यांची प्रकृती स्थिर, निगराणी आवश्यक

सफदरजंग रुग्णालयाने हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले की, वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ब्लड पॅरामीटरमध्ये किरकोळ बदल आहे. प्रदीर्घ उपोषणामुळे शरीरावर परिणाम झाला. डॉक्टरांचे मत आहे की, त्यांना मल्टी-डिसिप्लिनरी टीमच्या कडक निगराणीत देखभालीची गरज आहे.

गीतांजलींचा आरोप – बुलेटिनमध्ये पोटॅशियम लेव्हलचा उल्लेख नाही

गीतांजलींनी आरोप केला की, सफदरजंग रुग्णालयाने सांगितले की, पोटॅशियम लेव्हल घसरून २.९ राहिली, पण हेल्थ बुलेटिनमध्ये याचा समावेश नाही. स्वतंत्र टेस्टमध्ये ही लेव्हल ३.५ आढळली.

वांगचुक यांनी मार्चला ‘दुसरे स्वातंत्र्य आंदोलन’ म्हटले

वांगचुक यांनी २० जुलै रोजी होणाऱ्या संसद मार्चला भारताचे ‘दुसरे स्वातंत्र्य आंदोलन’ म्हटले. सफदरजंग रुग्णालयातून पत्नी गीतांजली आंग्मो यांच्यामार्फत पाठवलेल्या हस्तलिखित संदेशात वांगचुक यांनी ‘अन्यायापासून स्वातंत्र्य’ हे पेपरफुटी व ‘भीतीपासून स्वातंत्र्य’ हे आपल्या ‘बेकायदा कोठडी’शी जोडले आहे. संसदेपर्यंत मार्च. कृपया याला मोठे यश मिळवून द्या.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *