![]()
शनिवारी ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘श्रीकांत’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘आर्टिकल ३७०’ साठी यामी गौतमला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर, ‘ब्रमायुगम’साठी ममूटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यनला संयुक्तपणे प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. घोषित विजेत्यांमध्ये तमिळ चित्रपट ‘रायन’ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट, ‘कमेटी कुर्रोल्लू’ला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट, ‘लाहरी’ला सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट, ‘मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आणि ‘सुनीता’ला सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘कॅप्टन मिलर’ आणि ‘मेय्याझगन’ यांना विशेष उल्लेख (Special Mention) देऊन सन्मानित करण्यात आले. गैर-फिचर चित्रपटांचे विजेते गैर-फिचर चित्रपटांच्या श्रेणीत ‘भंगार (ऑब्सोलीट)’ला सर्वोत्कृष्ट गैर-फिचर चित्रपट म्हणून निवडण्यात आले. हिंदी चित्रपट ‘मैं निदा’ला सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर ‘हमसफर’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान देण्यात आला. बातमी सतत अपडेट करत आहोत…
