सिडको गुरुवार बाजार येथील उद्यानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव द्यावे,मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नवीन नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको येथील गुरूवार बाजार परिसरा लगत असलेल्या मध्यवर्ती उधाणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देण्याची मागणी परिसरातील आंबेडकर वादी बहुजन समाज बांधवांनी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
3 जानेवारी रोजी मनपाच्या मुख्यालयात मनपा आयुक्त डॉ.डोईफोडे यांच्यी प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनात ,मनपाच्या सिडको येथील मध्यवर्ती उद्याण हे मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य व अवैद्य धंद्याचे प्रमुख केंद्र बनलेले होते, या गोष्टीचा परिसरातील नागरिकांसह महिला-युवती व जेष्ठ नागरिक यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असे.
या गोष्टीचा विचार करुन सिडको- हडको नवीन नांदेड परिसरातील आंबेडकरवादी बहुजन बांधवांनी सर्वांच्या सहकार्याने तेथील घाण- अवैद्य धंदे बंद करुन ते ठिकाण गुन्हेगारी मुक्त करुन व सर्व उद्यानात मनोभाव सेवा करुन चार महिण्यां पासुन साफ सफाईसह त्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती तेजोमय पुतळा बसवून त्या ठिकाणी प्रत्येक पोर्णिमा, महापुरुषांच्या जयंत्या व ईतर समाजोपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम साजरे करत त्या ठिकाणा वरुन बहुजन समाजातील महापुरुषांचे विचार समाजात रुजविण्याचा सर्व स्वंयसेवकांनी वसा घेतला आहे. सर्व बार्बीचा विचार करता, तेथे जागतिक किर्तीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारुन त्या सर्व उद्यानात, परिसरात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, सिडको नवीन नांदेड” असे नाव देऊन आपल्या कार्यकाळात हा ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्व आंबेडकरी जनतेस आपला अभिमान वाटेल असा निर्णय घ्यावा, निवेदनाची दखल घेऊन तात्काळ आमचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तिव्र असा ‘धडक मोर्चा’ काढण्यात येईल असे निवेदन विलास गजभारे ,बालाजी गायकवाड, राजु लांडगे,आकाश सोनकांबळे प्रसेनजीत वाघमारे,चंद्रकांत डोपंले,सम्राट आढाव, सुनील वडगावकर,प्रा.एकनाथ वाघमारे,आनंदराव पवार येळीकर प्रदिप हनमंते,शामराव कांबळे,राहुल तारू,आकाश गजभारे,राजेश लांडगे यांनी दिले आहे.