रथसप्तमीनिमित्त सूर्याची उपासना;‎ हळदी-कुंकवाच्या उत्सवाची सांगता‎:धार्मिक, वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून घेत सूर्यपूजन‎




‘आरोग्यं भास्करादिच्छेत’: सूर्य‎जयंतीनिमित्त शहरातील विविध‎मंदिरांत, तसेच महिलांच्या गटांनी‎हळदी-कुंकू देत रथसप्तमी साजरी‎केली. सृष्टीचा आधारस्तंभ अन्‎ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्या‎भगवान सूर्यदेवाची उपासना करण्यात‎आली. संक्रांतोत्सवाचा हा शेवटचा‎दिवस असल्याने अनेक ठिकाणी‎हळदी-कुंकवाचे कार्यक्रम ठेवण्यात‎आले होते. साताऱ्यातील सरस्वती‎देवी मंदिरातील उत्सव वेगळेपणामुळे‎विशेष ठरला.‎ आस्था जनविकास संस्थेच्या डॉ.‎आरतीश्यामल जोशी यांनी हे‎आयोजन केले होते. यावेळी सजग‎संस्थेच्या डॉ. स्मिता अवचार, प्रा.‎भारती भांडेकर, अॅड. ज्योती पत्की‎यांची विशेष उपस्थिती होती. डॉ.‎जोशी म्हणाल्या, ‘सौभाग्यवतींना‎हळद-कुंकू लावत वाण देणे ही‎शतकानुशतकांची परंपरा आहे. मात्र,‎यामध्ये आपण नकळत समाजातील‎विधवा महिला, अविवाहित कन्या,‎प्रौढ अविवाहित महिलांना दूर ठेवतो.‎पती या उत्सवाच्या केंद्रस्थानी असतो. ‎हा सण महिलांचा असला तरी‎जीवनात पुरुषाची उपस्थितीच‎ सर्वोच्च असल्याचे यातून दिसून‎येते, पण ज्या महिला आपल्याला‎साथ देतात त्यांचा सन्मान यामध्ये‎होणे अपेक्षित आहे. विविध जाती,‎धर्म आणि पंथातील महिलांना एकत्र‎आणून हा सण अधिक समावेशक‎बनवायला हवा. या प्रेरणेने मी काही‎वर्षांपासून हळद-कुंकूची परंपरा‎सोडून ‘मकरसंक्रांती स्नेहमिलन’‎कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.‎घरगुती मदतनीससह प्राचार्या,‎डॉक्टर, पोलिस अधिकारी, पत्रकार‎महिलांना एकाच व्यासपीठावर‎आणले जाते. यासाठी संवाद‎महत्त्वाचा असतो.’‎ संक्रांतीनिमित्त अनोखे वाण‎ रिकाम्या पडलेल्या बाटल्यांवर आकर्षक‎पेंटिंग करून या भेटवस्तू स्वरुपात देण्यात‎आल्या. समाजाला निरोगी आणि मजबूत‎ठेवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन‎चालले पाहिजे. सण नकळत लोकांमध्ये‎अंतर निर्माण करणारा नसून मन‎मिळवणारा हवा, अशी अपेक्षा डॉ. जोशी‎यांनी व्यक्त केली.‎ धर्मग्रंथांनुसार रथसप्तमीचा अर्थ अन् महत्त्व‎ हिंदू धर्मग्रंथांनुसार, माघ सप्तमीला सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर‎आरूढ होऊन प्रकट झाले. म्हणूनच या दिवसाला ‘रथसप्तमी’ असे‎म्हणतात. हे सात घोडे म्हणजे इंद्रधनुष्यातील सात रंग आणि‎आठवड्याचे सात दिवस मानले जातात. वेदमृर्ती रामकृष्ण बारहाते‎म्हणाले, शास्त्रानुसार या दिवसापासून सूर्याच्या रथाचे तोंड उत्तरेकडे‎वळते, म्हणजेच उत्तरायणाची गती अधिक स्पष्ट होते. ‘आरोग्यं‎भास्करादिच्छेत’ या उक्तीनुसार आरोग्य आणि बुद्धीच्या प्राप्तीसाठी‎हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *