मोरबाबासह सेवादाराविरुध्द गुन्हा दाखल – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)-27 डिसेंबर रोजी कमलजितसिंघ जोगासिंघ बैस यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गंभीर स्वरुपाच्या दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.
कमलजितसिंघ जोगासिंघ बैस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 डिसेंबर रोजी माझा ऍटो क्रमांक एम.एच.26 के.3235 घेवून सायंकाळी 6 वाजता गुरुद्वारा येथे गेलो. माझे ऍटोमध्ये बसलेले भाविक प्रवाशी घेवून मी रात्री 10.30 ते 11 वाजेदरम्यान गुरुद्वारा लंगर साहिब येथे गेलो. तेथे गेट क्रमांक 2 आणि 4 च्या मध्ये माझा ऍटो थांबवला प्रवाशी खाली उतरत होते. तेंव्हा नरेंद्रसिंघ(मोर बाबा) यांनी मला शिवीगाळ केली. तेंेव्हा त्यांच्या सोबतचे सेवादार सतनामसिंघ यांनी तलवारीने माझ्या डाव्या पंजावर वार केला. मला इंदरजितसिंघ दफेदार आणि माझा भाऊ तेजविरसिंघ यांनी मला उपचारासाठी यशोसाई हॉस्पीटलमध्ये आणले आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 118(2), 352 आणि 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 631/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले हे करीत आहेत.
Post Views: 410