माळेगाव यात्रेत उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार
महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उदघाटन
लावणी महोत्सव ठरणार आकर्षण ; लावणी महोत्सउवात नऊ संचाचे होणार सादरीकरण
नांदेड:- श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार श्री खंडोबाच्या यात्रेत आज जिल्हा परिषदेच्यावतीने गुरुवार 2 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत कृषी प्रदर्शन, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन, कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, महिलांसाठी व बालकांसाठी स्पर्धा तसेच लावणी महोत्सव मुख्य आकर्षण ठरणार आहे.
उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 11 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धांचे उद्घाटन लातूर जिल्हयाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार श्रीजया चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व डॉ. शंकरराव चव्हावण कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव
दुपारी 2 वाजता माळेगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हायाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार राजेश पवार व प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी तीन वाजता लावणी महोत्सव
यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेला लावणी महोत्सव उद्या दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील व खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार डॉ. तुषार राठोड व आमदार बालाजीराव कल्याणकर याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
*लावणी महोत्सवात नऊ संचाचे होणार सादरीकरण*
लावणी महोत्सवात नऊ संचाचे सादरीकरण होणार असल्याने हा कार्यक्रम अतिशय आकर्षक ठरणार आहे. या संचांमध्ये प्रथितयश कलाकारांचा समावेश असून त्यामध्ये विविध ठिकाणांहून आलेले संच बहारदार लावण्यासह लोकसंगीत व नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. लावणी महोत्सवातील संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाचा समावेश आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांना देखील या महोत्सवात संधी मिळाली आहे. आज होणारा लावणी महोत्स व रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
L