पोलीस स्थापना दिवस निमित्ताने 2 ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस(राइजिंग डे) निमित्ताने दि.2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस विभागातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने प्रसिध्दीसाठी पाठविली आहे.
दि.2 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेदरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालय येथून दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौडमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आाणि विद्यार्थीनी भाग घेतील. पोलीस बॅन्ड पथक पोलीस ठाणे इतवारा आणि वजिराबादच्या हद्दीतील मुख्य चौकांमध्ये संगित प्रदर्शित करतील.
दि.3 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरीकांची बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलविण्यात आली आहे. त्यांच्या सर्व समस्या ऐकून त्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. ही बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्ष, सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांच्यावतीने घेण्यात येईल. 3 जानेवारी रोजी भोकर हद्दीतील मुख्य चौकांमध्ये पोलीस बॅंन्ड पथक आपली कला सादर करतील.
4 जानेवारी रोजी खाजगी शिकवणी, शाळा आणि महाविद्यालयास भेटी देवून महिला सुरक्षा विषयी माहिती देण्यात येईल. शाळा आणि महाविद्यालयातील मुलांच्या आणि मुलींच्या अडचणी समजून घेवून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळच्या हद्दीतील मुख्य चौकांमध्ये पोलीस बॅंड पथक आपली कला सादर करेल.
दि.5 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात जमा असलेल्या मौल्यवान मुद्देमालाची जास्तीत जास्त निर्गती करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मालकांना परत करण्यात येईल. याच दिवशी पोलीस ठाणे शिवाजीनगर आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौकांमध्ये पोलीस बॅंड पथक आपली कला सादर करेल.
दि.6 जानेवारी रोजी दर्पण दिन/ पत्रकार दिन या अनुषंगाने पत्रकारांची बैठक आयोजित करून चहा-पाण्याचा आणि फराळाचा कार्यक्रम होईल. या दिवशी जिल्हाधिकारी का र्यालयातील नियोजन भवन येथे पोलीस बॅन्ड पथक आपली कला सादर करेल.
दि.7 जानेवारी रोजी पोलीस ठ ाणे अर्धापुरच्या मुख्य चौकांमध्ये पोलीस बॅन्ड पथक आपली कला सादर करेल.
दि.8 जानेवारी रोजी शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीसांच्या कामकाजांची, शस्त्रांची माहिती देण्यात येईल. याच दिवशी पोलीस ठाणे लोहा हद्दीतील मुख्य चौकांमध्ये पोलीस बॅंन्ड पथक आपली कला सादर करेल.