नांदेड जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ ;नवीन वर्षाची सुरुवात वाचनाने
नांदेड- “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वाचन पंधरवाडयानिमित्त नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व वाचन सामूहिक कार्यक्रमअसे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन,वाचन कौशल्य कार्यशाळा निवडलेल्या पुस्तकांचे सामुहिक वाचन लेखन व विद्यार्थी यांच्या मधील वाचन संवाद कार्यक्रम,पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राम मनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालय,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या अभ्यासिकेत सामुहिक वाचन करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी, महापालिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनीही विद्यार्थ्यासोबत सामुहीक वाचन करुन “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सुरुवात केली.
नांदेड जिल्ह्यात आज संभाजी सार्वजनिक वाचनालय,वाढवणा, भगवान श्रीकृष्ण वाचनालय,भोकर, हु.संतराम कांगठीकर वाचनालय,अर्जापूर,सचखंड गुरुव्दारा संचलित श्री हुजूर साहेब सार्वजनिक वाचनालय,नांदेड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय,नगर परिषद कंधार, श्री समर्थ वाचनालय देगलूर,श्री संत नारायणगीरी महाराज सार्वजनिक वाचनालय वासरी, का.मातोश्री सुंदराबाई सार्वजनिक वाचनालय,बिलोली यांनी या उपक्रमात प्रामुख्याने सहभाग घेतला.