31 डिसेंबर रोजी पोलीसांनी 1 लाख 28 हजार रुपये दंड वसुल केला
नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदी काळात 1200 पोलीस कार्यरत होते. सोबतच 1 लाख 27 हजार 913 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर पोलीस अधिकारी-100, पोलीस अंमलदार-500, गृहरक्षक दलाचे जवान-600 एवढ्या मनुष्यबळाने मेहनत घेतली. 54 ठिकाणी नाका बंदी करण्यात आली होती. 6 ड्रंक ऍन्ड ड्राईव्हची कार्यवाही करण्यात आली. संशयीत असलेल्या 2319 वाहनांवर कार्यवाही झाली. प्रतिबंधात्मक कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेने 3 केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने एक आमस ऍक्टची कार्यवाही केली आहे. तसेच इतर 82 केसेस करण्यात आल्या आहेत. या सर्व कार्यवाहीतून 1 लाख 27 हजार 913 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस शफाकत आमना, कृतिका, अश्र्विनी जगताप, संकेत गोसावी यांच्यासह सर्व पोलीस उपअधिक्षक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, 36 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी ही कार्यवाही 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारी 2025च्या पहाटे 4 वाजेपर्यंत केली आहे.