पिंपळगाव डुकरा येथील महिलांचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प:नवचेतना अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी एकल महिला मेळावा




प्रतिनिधी | इगतपुरी पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीत एकल महिलांचा सन्मान करण्यात आला. मुलगी १८ वर्षाच्या आत आणि मुलगा २१ वर्षाच्या आत असेल, तर बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि त्याला मदत करणार नाही, अशी शपथ यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी एकल महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना कुंकवाचा करंडा भेट देण्यात आला. सरकारने बाल विवाहमुक्त भारत मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत बालविवाहाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी शपथ घेतली जात आहे.यामध्ये नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. या अभियानाचा उद्देश २०२६ पर्यंत बालविवाह १० टक्क्याने कमी करून २०३० पर्यंत भारत बालविवाह मुक्त करणे हा आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *