![]()
अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेमाच्या मुद्यावर अत्यंत परखड विधान केले आहे. प्रेम ही केवळ क्षणिक भावना नाही. ती मागील जन्मातील कर्मांमशी जोडलेली संकल्पना आहे. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा खोलवर कार्मिक कनेक्शन असते, तेव्हाच प्रेम होते, असे तिने म्हटले आहे. प्राजक्ता माळी अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. ती अनेक सामाजिक मुद्यांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसून येते. तिने प्रेमाच्या मुद्यावरही आपले परखड मत व्यक्त केले. तुला प्रेमाबद्दल काय वाटते? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, ती म्हणाली, प्रेम ही केवळ क्षणिक भावना नाही. ती मागील जन्माताली कर्माशी जोडलेली संकल्पना आहे. हा विषय सर्वांनाच आवडतो. पण तेवढाच अघडही आहे. जे लगेच, उत्स्फुर्तपणे वाटते, ते मला प्रेम वाट तनाही. ते आकर्षण असते. प्रेम तेव्हाच होते, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक कनेक्शन असते. मागील जन्मातील शत्रू, या जन्मात जोडीदार असतो ही अशी फिलॉसॉफी आहे की, मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार असतो. मागील जन्मातील शत्रूत्व सौम्य असेल तर या जन्मातले नातेही तसेच असते. माझे जास्त वाचन असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलून गेली आहे, असे ती म्हणाली. प्राजक्ता माळी ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिका, वेबस्टोरीमधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासह ती एक उत्तम डान्सरही आहे. ती दागिन्यांच्या व्यवसायातही आहे. एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तसंच तिचा स्वत: दागिन्याचा व्यवसाय सुद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहत्यांमध्ये देखील तिची मोठी क्रेझ आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात राहते. त्यामुळे तिची फॅनफॉलोइंगही खूप मोठी आहे. तिच्या कामाविषयी बोलायचे तर तिची जुळून येती रेशीमगाठी ही मालिका प्रचंड गाजली. त्यानंतर नकटीच्या लग्नाला यायचं हां, फुलवंती, खो-खो, चंद्रमुखी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिकाी साकारली. मालिका व चित्रपटांसह तिचा रानबाजार ही वेबसीरिजही खूप गाजली. या सीरिजमधील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोचे सूत्रसंचालनही करते.
प्रेमाचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी:मागील जन्माचा शत्रू या जन्मात जोडीदार असतो, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे परखड विधान
