[ads1]
![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत ठाकरे बंधूंनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी एकत्रित मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, यावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांचा हा मोर्चा यशस्वी होणार नसल्याचा दावा केला आहे. तसेच, राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत लवकरच आपण त्यांचे पितळ उघडे पाडणार असल्याचा थेट इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ओबीसी, कष्टकरी, वंचित आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंचा निषेध करावा. राज ठाकरेंचं राजकारण म्हणजे ‘राजकीय दुकानदारी’ आहे. 4 ऑक्टोबरला मोर्चा यशस्वी होणार नाही. राज ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांच्या प्रकरणावरही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. तसेच राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांना घाबरणार नाही. राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार. मुंबई बंद, रस्ते बंद केल्यास नागरिकांना त्रास होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन आणि फाईल नोटिंग म्हणजे जजमेंट नाही. फाईल नोटिंगच्या आधारे कोणताही हक्क सिद्ध करता येत नाही. महादेव विरुद्ध सोहन देवी 2002 च्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की न्यायालयीन निर्णय आणि अंतर्गत नोटिंगमध्ये फरक आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जायला तयार असल्याचे विधान केले होते. यावर आक्षेप घेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांचे शेतकरी आंदोलन हे स्क्रिप्ट आहे. शेतकऱ्यांच्या भावनांवर राजकारण करू नये. मी कॉर्पोरेट शेतकरी नाही, सोयाबीनचा शेतकरी आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटले. तसेच दुष्काळाची मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची मागणी देखील सदावर्ते यांनी केली आहे.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad