[ads1]
![]()
गुवाहाटी विद्यापीठातील समाजशास्त्राची २२ वर्षीय विद्यार्थिनी निमिषा ठाकुरिया हिचा एका होमस्टेमध्ये मृत्यू झाला. निमिषा तिचा बॉयफ्रेंड आसिफ अलीसोबत शुक्रवार रात्रीपासून येथे थांबली होती. या प्रकरणात आसिफ अलीला अटक करण्यात आली आहे. आसिफचा दावा आहे की, निमिषाने आत्महत्या केली. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना हे हत्या प्रकरण असल्याचे दिसत आहे. निमिषाच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री निमिषाचा फोन आला होता. ती एवढेच म्हणू शकली—ते मला मारून टाकतील. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. त्यामुळे तिच्याकडून फोन हिसकावून घेतला असावा, अशी शक्यता आहे. मात्र, या दाव्याची अद्याप चौकशी होणे बाकी आहे. केअरटेकरने ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकला होता होमस्टेचे केअरटेकर आणि स्वयंपाकी बिपुल बाइलुंग यांनी घटनेच्या रात्री घडलेला प्रकार प्रत्यक्षदर्शीप्रमाणे सांगितला. त्यांनी सांगितले की, रात्री त्यांनी एका पुरुषाचा ओरडण्याचा आवाज ऐकला. तो म्हणत होता, “दादा, उठा, उठा.” बाइलुंग यांनी सांगितले, जेव्हा आम्ही आवाजाच्या दिशेने गेलो, तेव्हा खोलीत एक मुलगा मुलीच्या शरीराला धरून बसला होता आणि मुलगी जमिनीवर पडलेली होती. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघे यापूर्वीही या होमस्टेमध्ये थांबले होते आणि त्या रात्री त्यांनी खोली क्रमांक १० बुक केली होती. दोघेही याच होमस्टेमध्ये नेहमी मुक्कामासाठी येत असत आजरा परिसरातील एका होमस्टेमध्ये निमिषा बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निमिषा समाजशास्त्राची विद्यार्थिनी होती आणि धारापूरची रहिवासी होती. होमस्टेच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, निमिषा आणि आसिफ अनेकदा या होमस्टेमध्ये मुक्कामासाठी येत असत. गुवाहाटी पोलिसांचे डीसीपी (पश्चिम) बोलिन देवरी यांच्या म्हणण्यानुसार, आसिफचे म्हणणे आहे की निमिषाने छताच्या पंख्याला गळफास घेतला होता आणि त्याने तिला खाली उतरवले. मात्र, पोलिसांनी त्याचा दावा अंतिम निष्कर्ष मानलेला नाही. डीसीपींनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातील. लव्ह जिहादचा आरोप, परिसरात तणाव मृत महिला हिंदू समाजातील होती आणि अटक करण्यात आलेला आरोपी मुस्लिम आहे. त्यामुळे घटनेनंतर परिसरात तणाव पसरला. काही दक्षिणपंथी संघटनांनी लव्ह जिहादचा आरोप करत आंदोलन केले. आंदोलकांनी मुख्य रस्ता अडवून धरला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad