नांदेड येथील 22 पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षक कार्यमुक्त
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांनी राज्यातील 331 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर नांदेड येथील पदोन्नती प्राप्त 22 पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना नांदेड जिल्ह्यातून कार्यमुक्त केले आहे.
दि.1 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील 331 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिली होती. त्या अनुशंगाने नांदेड येथील पदोन्नती प्राप्त 22 सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नतीसाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती लिहिलेली आहे. विठ्ठल एकनाथ कत्ते-पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर, संजय अंबादासराव जोशी, अनिल महादु पोहरे, बाबा नागोराव गजभारे, शेख आयुब शेख इमामसाब, सुदाम अमरु आडे, सुधाकर संग्रामसिंग राठोड, अशोककुमार भिमराव गुडपे, सुभाष संभाजी पवार, उत्तम माधवराव डोईबळे, देविदास बापुराव भिसाडे-नांदेड पोलीस परिक्षेत्र, मधुकर नागोराव पवार, महेंद्र माधवराव नागुलवाड, सुभाष खंडू कदम, सुरेश सुभानजी वाघमारे, पिराजी लालू गायकवाड, बालाजी गंगाराम काळे, वसंत सुकाजी जाधव, मारोती नारायणराव तेलंगे, चंद्रकांत कोंडीबा पवार, बालाजी लक्ष्मणराव महागावकर-मुंबई शहर.
Post Views: 92