केशरी शिधापत्रिकाधारक 9220 जणांचे आठ कोटींचे अनुदान थकीत:एप्रिल 2025 पासून कन्नडच्या शेतकऱ्यांना रेशन नाही‎




शासनाने थेट रेशन धान्य देण्याऐवजी (केशरी शिधापत्रिकाधारक) शेतकऱ्यांना एलडीबीटी शेतकरी लाभार्थी योजना लागू करून थेट अनुदानच खात्यात जमा करण्याची घोषणा केली. या योजनेत तालुक्यात ९ हजार २०० लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, या शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एप्रिल २०२५ पासून अनुदानच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. तालुक्यात ८ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. मध्यंतरी शासनाने रेशनबाबतीत नवीन धोरण अमलात आणले. त्यात अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यासोबतच शेतकरी लाभार्थी योजना लागू केली. शेतकऱ्यांना थेट रेशन देण्याऐवजी प्रति व्यक्ती १५० रुपये रक्कम स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सातबारा, बँक खाते, आधार कार्ड याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. तालुक्यात ५२ हजार ५४९ लाभार्थी या योजनेच्या कक्षेत आले. २०२५ ला काही त्रुटी काढून ९ हजार २०० लाभार्थी निश्चित करण्यात आले. २०२५ ला सुरुवातीला १५० रुपये माणसी एक हप्ता या लाभार्थींच्या खात्यात जमा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषिभूषण भाऊसाहेब थोरात म्हणाले, शासनाला ही योजनाच बंद करायची आहे. त्यासाठी हा घोळ घालण्यात येत आहे. १७० रुपये खात्यावर जमा केलेल्या किती शेतकऱ्यांनी बाहेर दुकानात जाऊन रेशन खरेदी केले? एवढ्या रकमेत किती धान्य येईल? रेशनवर शासन अनुदान असल्याने शासकीय दरात रेशन उपलब्ध होते. १७० रुपयांत किती किलो धान्य मिळेल हा संशोधनाचा विषय आहे. ११ महिन्यांपासून शेतकरी शिधापत्रिकाधारक रेशन अनुदानापासून वंचित आहेत. नीलेश राठोड, नायब तहसीलदार (पुरवठा विभाग) करण्यात आले. नंतर हे अनुदान माणसी वीस रुपये वाढवून १७० रुपये करण्यात आले. या वाढीव अनुदानासह पहिल्या हप्त्यापोटी १० कोटी २६ लाख १२ हजार ६०० रुपये अनुदान जमा करण्यात आले. त्यानंतर शासनाने या शिधापत्रिकाधारकांना वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. सत्यशोधक शेतकरी संघटनेचे नेते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी या प्रश्नी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यात या योजनेपासून चार हजार शेतकरी वंचित ठेवण्यात आले आहे. दर महिन्याला साधारणतः नव्वद लाख रुपये अनुदान जमा होणे अपेक्षित आहे. शासन आपले दायित्व विसरले आहे. वेळीच लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी तालुक्यामधून होत आहे. Q- तालुक्यात किती रेशन दुकानदार आहेत? A. २४२ रेशन दुकानदार असून त्यांच्यामार्फत रेशनचे वितरण होते. Q- ‘एलडीबीटी योजनेचे’ किती लाभार्थी आहेत? A. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तालुक्यामध्ये या योजनेचे ९२२० लाभार्थी पात्र आढळून आले. Q-पात्र शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळेल? A. आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मागणी नोंदवली आहे. एप्रिल २०२५ पासून अनुदान आलेले नाही. वरिष्ठांकडे पाठपुरावा करत आहोत. Q- इतर शिधापत्रिकांधारकांना कसे रेशन मिळते? A. ‘अंत्योदय’चे लाभार्थी ५२०० असून यात प्रतिशिधापत्रिका ३५ किलो गहू-तांदूळ मिळतो तसेच एक किलो साखर २० रुपये किलो दराने मिळते. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत तालुक्यात ५२ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रतिमाह तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू देण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *