स्थानिक गुन्हा शाखेने एका युवकाकडून पिस्तुल जप्त केले
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने 6 ऑक्टोबर रोजी एका युवकाकडून पिस्तुल जप्त केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, गणेश लोसरवाड, बालाजी यादगिरवाड, सायबर सेलचे राजू सिटीकर आणि दिपक ओढणे हे गस्त करत असतांना हनुमानगड कमानीजवळ एक युवक कंबरेला पिस्तुल लावून दहशत पसरवितांना दिसला. त्याचे नाव शैलेश बाबुसिंह परमार(26) रा.गोपाळनगर नांदेड असे आहे. त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलबाबतच्या मालकीची माहिती विचारली असता त्याला उत्तर देता आले नाही. मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात शैलेश परमारविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 412/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांचे कौतुक केले आहे.
Post Views: 199