![]()
दिवंगत सुनीता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या ‘स्व. सुनीता पाटील मेमोरियल फाऊंडेशन’ने जिल्ह्यातील २४ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्
.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, शिक्षणाधिकारी सतीश मुगल, डायटचे अधिव्याख्याता डॉ. दीपक चांदूरे, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ व संदीप बोडखे, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळे आणि प्रतिष्ठानचे संस्थापक किरण पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सीईओ संजिता महापात्र यांनी फाऊंडेशनचे किरण पाटील आणि डॉ. तनुश्री पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत प्रतिष्ठानचे कार्य पोहोचण्यासाठी इतरांनीही अशा सामाजिक कार्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
इतर मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. केंद्रप्रमुख सुभाष सहारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर डॉ. तनुश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. गजानन चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनीता पाटील यांनी ज्या शाळांमध्ये सेवा दिली, त्या शाळांना तसेच प्रत्येक तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतर शाळांना हे साहित्य देण्यात आले. दिवंगत सुनीता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साउंड सिस्टीम, कपाट, टेबल, खुर्ची आणि इतर शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
या उपक्रमाचा लाभ भातकुली तालुक्यातील निंभा, परलाम, मार्की, साहूर; चिखलदरा तालुक्यातील कन्हेरी, गडगाभांडुम, काजलडोह; चांदुर रेल्वे तालुक्यातील तरोडा, दहीगाव धावडे, आमला, धनोडी, जळका जगताप; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी, रोहणा; दर्यापूर तालुक्यातील नालवाडा, साईनगर; धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा, शेंदुर्जना खुर्द; अमरावतीमधील अंतोरा; अंजनगाव सुर्जीमधील कारला; धारणी तालुक्यातील चिखलढाणा; मोर्शीमधील चिखलसावंगी आणि वरूडमधील शहापूर या २४ शाळांना मिळाला.
