Hingoli Zilla Parishad Works Holiday Clears Pendency | हिंगोली जिल्हा परिषदेचे कामकाज रविवारीही सुरू: सीईओंच्या आदेशानंतर प्रलंबित कामांच्या निपटारासाठी कर्मचारी सुटीच्या दिवशी हजर – Hingoli News



जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी ही कार्यालय सुरू ठेवण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतर शनिवारी ता 27 जिल्हा परिषदेमधील सर्व विभागातील कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही हजर झाले.सर्व विभा

.

हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत बहुतांश विभागांमधून कामे मोठ्या संख्येने प्रलंबित असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागांच्या बैठकीमधून प्रलंबित कामाची बाब स्पष्ट झाली होती. याशिवाय मोठ्या संख्येने लेखा आक्षेप देखील प्रलंबित असल्याचे चित्र होते.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी शनिवारी ता २७ व रविवारी ता २८ या सुट्टीच्या दिवशी कार्यालय नियमित सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लेखी पत्र देखील काढण्यात आले.

त्यानुसार शनिवारी ता २७ रोजी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात अधिकारी, कर्मचारी कार्यालयात हजर झाले. कर्मचाऱ्यांनी प्रलंबित कामाचा निपटारा, स्थानिक निधी लेखा आक्षेप, महालेखा नागपूर येथील लेखा आक्षेप निकाली काढण्यासाठी अनुपालन अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इतर प्रलंबित कामे देखील करण्यात आली. सुट्टीच्या दिवशीही अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय गजबजले होते. आरोग्य विभाग, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन विभाग, लघुसिंचन, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागात कर्मचारी काम करताना दिसून आले. रविवारी ता २८ रोजीही कार्यालय सुरू राहणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान सुट्टीच्या दिवशीही कार्यालयाचे कामकाज सुरू राहत असल्यामुळे आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या कामकाजात गतिमानता आल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *