Sayaji Shinde Sahyadri Deorai Forest Fire Beed Damage Rescue Efforts | वर्षानुवर्षांची मेहनत आगीत भस्म!: अभिनेते सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; हजारो झाडे अन् दुर्मिळ वनसंपदा खाक – Beed News



आपल्या अभिनयासोबतच वृक्षारोपणाच्या चळवळीसाठी ओळखले जाणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवण डोंगररांगेत उभ्या केलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले असून, यात हजारो झाडे, दुर्मिळ औष

.

सायंकाळच्या सुमारास पालवण डोंगरावर अचानक धुराचे लोट दिसू लागले. उन्हाळ्याचे दिवस आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आकाशात झेपावताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाळलेले गवत आणि कडक उन्हामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत असले, तरी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वर्षानुवर्षांची मेहनत आगीत भस्म

सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराचा कायापालट करून तिथे घनदाट जंगल उभे करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. कडक उन्हाळ्यातही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून पाण्याचे टँकर लावून इथली झाडे जगवण्यात आली होती. या देवराईत अनेक दुर्मिळ भारतीय वृक्षांची जोपासना केली जात होती, ज्यामुळे परिसरात विविध पक्षी आणि वन्यजीवांचा वावर वाढला होता. मात्र, आज लागलेल्या या आगीमुळे ही संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली असून, निसर्गप्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *