Malvan Sea Swimming Competition Wardha Students Victory | मालवणच्या खवळलेल्या समुद्रात वर्ध्याचा डंका: राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 3 किमीचे आव्हान, दोन विद्यार्थ्यांनी रोवला विजयाचा झेंडा – Nagpur News


रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण येथील निसर्गरम्य चिवला बीचवर राज्यस्तरीय समुद्र जलतरण स्पर्धा अतिशय रोमहर्षक वातावरणात पार पडली. समुद्रातील खवळलेल्या लाटा, प्रचंड प्रवाह आणि दीर्घ अंतर यामुळे ही स्पर्धा केवळ शारीरिक ताकदीचीच नव्हे तर मानसिक खंबीरतेचीही ख

.

स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने नावांच्या सहाय्याने किनाऱ्यावर जवळून तीन किलोमीटर अंतरावर समुद्रात सोडण्यात आले. त्यानंतर किनाऱ्याकडे येण्यासाठी तीन किलोमीटरचे अंतर जलतरण करत पूर्ण करायचे होते. सुरुवातीचा उत्साह ओसरल्यानंतर समुद्रातील वेगवान प्रवाह आणि थकवा यामुळे १२ ते १५ वयोगटातील अनेक स्पर्धकांना एक ते दीड किलोमीटर अंतर गाठल्यानंतरच माघार घ्यावी लागली. मात्र मोजक्याच जिद्दी जलतरणपटूंनी शेवटपर्यंत टिकून राहण्याचे धैर्य दाखविले.

या कठीण स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. सौफा इंग्लिश स्कूल, बोरगाव मेघे येथील मारुफ नवाब शेख वय १४ रा महादेवपुरा वर्धा तसेच सेंट अँथोनी नॅशनल स्कूल येथील रुद्रा जयश डांगे वय १४ रा इसाजी लेआऊट वर्धा या दोघांनीही समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट जलतरण कौशल्याचे दर्शन घडविले. लाटांशी झुंज देत, दमछाक होत असतानाही त्यांनी हार न मानता तीन किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करीत किनारा गाठला.

या दोन्ही विद्यार्थ्यांची कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून ती वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि प्रशिक्षकांना दिले. त्यांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही हे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *