Chalisgaon Missing Girl Case School Bag Found | चाळीसगाव हादरले!: तरवाडे बुद्रुकमधून 9 वर्षांची चिमुकली शाळेतून बेपत्ता, वेशीबाहेर सापडले दप्तर – Chalisgaon News



शाळेत गेलेली एक 9 वर्षांची चिमुकली घरी न परतल्याने आणि तिचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आल्याने चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक परिसरात खळबळ उडाली आहे. धनश्री शिंदे असे या बेपत्ता मुलीचे नाव असून, घटनेला तीन दिवस उलटूनही तिचा कोणताही सुगावा न

.

धनश्री ही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत शिकते. 12 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता ती शाळेत गेली होती. सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर इतर मुले घरी परतली, मात्र धनश्री घरी आली नाही. उशीर झाल्याने पालकांनी शाळेकडे धाव घेतली, मात्र ती तिथेही नव्हती. घाबरलेल्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी संपूर्ण गाव पिंजून काढले, परंतु तिचा पत्ता लागला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, तिचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आल्याने या प्रकरणाला गूढ वळण मिळाले आहे.

महिलेच्या जबाबाने संशय बळावला

धनश्रीच्या वडिलांनी एका संशयास्पद प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. शोधाशोध सुरू असताना त्यांनी एका महिलेकडे चौकशी केली होती. मात्र, या महिलेने तीन वेगवेगळ्या वेळी तीन वेगवेगळी उत्तरे देऊन दिशाभूल केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. पहिल्यांदा विचारले असता, धनश्री एका मुलीसोबत तांड्याच्या दिशेने गेल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने विचारले असता, ती गावातील एका व तांड्यावरील एका अशा दोन मुलींसोबत गेल्याचे सांगितले. तिसऱ्यांदा चुलत भावाने विचारले असता, ती कडगाव रस्त्याच्या दिशेने गेल्याचे उत्तर दिले. या विसंगत माहितीमुळे तपास भरकटला असून पोलिस आता या दिशेनेही तपास करत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून मुलगी बेपत्ता असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात तळ ठोकून आहे. पोलिसांनी शाळेतील शिक्षकांकडे विचारपूस केली असून गावकऱ्यांचे जबाब नोंदवणे सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *