राजकीय शिमगा:‘इस्लाम’चे नेते, माजी आमदार शेख खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर, मालेगावात हाेळीच्या दिवशी रंगले आराेप-प्रत्याराेप
![]()
इस्लाम पार्टीचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी सोमवारी (दि.२) दुपारी खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. हा मुद्दा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उचलून धरत औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या मानसिकतेची प्रतिकात्मक होळी करत निषेध केला. धार्मिक मुद्द्यांवरुन शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना होळीच्या दिवशीही औरंगजेबाचे समर्थन व विरोधातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा शिमगा रंगला. माजी आमदार शेख यांनी आपल्या समर्थकांसह औरंगजेबाच्या कबरीवर जावून दुवापठण केले. औरंगजेब हे पवित्र होते असे विधान करत शेख यांनी पुन्हा एकदा त्यांना उत्तम प्रशासक असल्याचे संबोधले. आम्ही जो इतिहास वाचला आहे, तो औरंगजेबाचे समर्थन करणारा आहे. स्वत:च्या हाताने शिवलेल्या टोप्या विकून मेहनतीची भाकरी खाणारे औरंगजेब पवित्रच होते असे शेख म्हणाले. या भूमिकेचा तीव्र विरोध करत भाजपचे शहराध्यक्ष देवा पाटील यांनी बारा बंगला भागात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या मानसिकतेची प्रतिकात्मक होळी केली. जातीयवादाला खतपाणी घालणारे कृत्य आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे विचार मानणारे आहोत. शेख यांचे हे कृत्य जातीयवादाला खतपाणी घालणारे आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदो उदो होवू देणार नाही असा इशारा पाटील यांनी दिली. मनपाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेताना माजी आमदार आसिफ शेख. तर दुसऱ्या छायाचित्रात मालेगावी उदात्तीकरण मानसिकतेचे प्रतिकात्मक होळीत दहन करताना भाजपचे देवा पाटील व कार्यकर्ते. मालेगावी उदात्तीकरणाच्या मानसिकतेची भाजपकडून प्रतिकात्मक होळी होळीत मनपाच्या भ्रष्ट कारभाराचेही दहन करत निषेध करण्यात आला. टेंडर घोटाळा, बेकायदा अतिक्रमण, खाजगी वीज कंपनीची मनमानी, अस्वच्छता, वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, धुळीचे साम्राज्य, जातीयवाद आदी समस्यांचे फलक होळीभोवती लावून दहन करण्यात आले. याप्रसंगी दादा जाधव, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, जगदीश गोऱ्हे आदी उपस्थित होते.
