चोरट्यांचा पुन्हा हैदोस; जयभीमनगरातील घर फोडून ५७ हजारांचा ऐवज गायब


नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयभीमनगर परिसरात बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास जयभीमनगर येथील एका घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली सुटकेसच चोरून नेली. या चोरीत एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.
याप्रकरणी फिर्यादी राणी नंदू रोकडे (वय ३५, रा. जयभीमनगर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस)-२०२३ च्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आकोसकर करीत आहेत.


Post Views: 6






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *