![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या सोशल मीडियावरून ‘गुंगी गुडिया’ अशी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त पोस्टप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या काँग्रेसवर चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून, आता या संपूर्ण वादावर सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीही पुढे येत आपली प्रतिक्रिया देत ठाम भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना जय पवार यांनी लिहिले की, माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर समाजात स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे. महिलांचा अवमान करणारी भाषा लोकशाहीत स्वीकारली जाऊ शकत नाही जय पवार पुढे लिहितात की, माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही.. तसेच राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते—महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत. आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिलाच पाहिजे, असे मत जय पवारांनी व्यक्त केले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा ‘इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिले’:CM फडणवीसांचे प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे म्हणाले- सुनेत्रा पवारांचा नव्हे तमाम माता-भगिनींचा अपमान राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सविस्तर वाचा
"हा केवळ माझ्या आईचा नाही, तर प्रत्येक महिलेचा अपमान!":सुनेत्रा पवारांवरील टीकेवर जय पवारांचे काँग्रेसला सडेतोड उत्तर
