पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत तहसील कार्यालय भोकर येथे ही घटना घडली. या प्रकरणी इल्यियास वहिद, वहिद इमामसाब लोथे (रा. भोकर) आणि तहसील कार्यालयातील लिपिक प्रशांत गोडबोले यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी मूळ पंचनाम्यात खाडाखोड करून मजकूर बदलल्याचा आरोप आहे. तसेच बदललेला पंचनामा विविध ठिकाणी वापरून फिर्यादीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, संबंधितांनी शेतात जाण्यास अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सय्यद अहमद सय्यद कासीम (वय 63, रा. भोकर, ता. भोकर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 391/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस)-2023 मधील कलम 318(4), 336(1), 335, 336(3), 340(1)(2), 339, 338, 352 आणि 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.
