![]()
महिलेशी शिवीगाळ करून तिच्या विनयभंगास कारणीभूत ठरेल असे कृत्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अनिल शामराव सावंत (रा. दौलतनगर, सातारा) याच्याविरुद्ध संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून महिला पोलीस नाईक बोराटे पुढील तपास करीत आहेत. युवतीचा पाठलाग व फोनवरून त्रास; एकाविरुद्ध गुन्हा दाखल शहरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीचा पाठलाग करून तिला फोनवरून शिवीगाळ व त्रास दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी प्रतिक हणमंत शिंदे (रा. चिमणगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून महिला पोलीस हवालदार माने पुढील तपास करीत आहेत. तीन बालकामगार कामावर ठेवल्याचा आरोप; कंपनी मालकावर गुन्हा सातारा येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील एका स्टील फर्निचर उद्योगात तीन बालकामगारांना कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजयसिंह गंभीरसिंह जाला (रा. शाहूपुरी, सातारा) यांच्या शिवशक्ती स्टील फर्निचर कंपनीत बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून महिला पोलीस हवालदार देखणे तपास करीत आहेत.
सातारा गुन्हेगारी वार्ता:महिलेशी गैरवर्तन; संशयिताविरुद्ध शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
