भारतीय लष्कराचे माजी प्रमुख मनोज पांडे करणार दीक्षांत भाषण:अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे




संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बेचाळीसावा दीक्षांत समारंभ सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी भारतीय सैन्य दलाचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण देणार आहेत. महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मान्यतेने आयोजित या समारंभात सुमारे ४१ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. हा कार्यक्रम विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या डोममध्ये सकाळी १० वाजता सुरू होईल. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विद्यापीठाच्या सर्व प्राधिकारिणींचे प्रमुख पदाधिकारीही यावेळी मंचावर उपस्थित राहणार आहेत. जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख असताना उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थी आणि विद्वतजन त्यांच्या दीक्षांत भाषणाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *