![]()
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सिकंदराबाद विभागात येणारे परळी(जि. बीड), उदगीर (जि. लातूर)व हैदराबाद विभागातील धर्माबाद (जि. नांदेड) ही रेल्वे स्थानके नांदेडविभागात समाविष्ट करण्यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. वरील तिन्ही स्थानके नांदेड विभागात आल्यास मराठी भाषिक शहरे एकत्र येणार आहेत. या विभागाच्या मालवाहतुकीमुळे उत्पन्न वाढणार आहे. प्रवाशांना वेगाचा फायदा होणार आहे. सुरक्षेतही सुधारणा होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे. दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सध्या कार्यरत तीन विभाग आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिकंदराबाद, हैदराबाद व नांदेड यांचा समावेश आहे. अन्य तीन विभाग यापूर्वीच दक्षिण मध्य रेल्वेमधून वेगळे झाल्यामुळे गुंतकल, गुंटूर व विजयवाडा हे तीन विभाग आता साऊथ कोस्टल रेल्वे विभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. या कारणास्तव सिकंदराबाद, हैदराबाद व नांदेड या तीन विभागांनी आपसात १ एप्रिल २०२६ पासून स्टेशन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नांदेड विभागाची मर्यादा पूर्वी केवळ नांदेड-हैदराबादमार्गावर मुदखेड स्टेशनजवळअसलेल्या शिवणगावपर्यंत होती.आता ही मर्यादा वाढवून उमरीअथवा धर्माबादपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. परळी-विकाराबादमार्गावर लातूर रोड अथवाउदगीरपर्यंत नांदेड विभागवाढविण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा विभागनांदेड विभागात जोडला जाणार आहे. १०६ किलोमीटर रेल्वेट्रॅकमध्ये वाढ होणार सध्या नांदेड विभागात ९९१किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक(पटरी) आहे. लातूर रोड ते उमरी(जि. नांदेड) पर्यंतचा भागजोडल्यास रेल्वे ट्रॅकचे अंतर १हजार ९७ किलोमीटर होईल. एकूण१०६ किलोमीटर रेल्वे ट्रॅकची वाढहोईल, असे मराठवाडा प्रवासीमहासंघाकडून सांगण्यात आले.
