मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10 हजार कोटींचा घोटाळा:ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप, चौकशीची मागणी




मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा महा-घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट द्वारे केला आहे. राज्य सरकारने सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX या कंपन्यांनी कथितरित्या बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटे मिळवली आहे . महावितरणमधील काही अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे संचालक दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू यांच्या संगनमताने हा प्रकार घडला आहे का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला आहे. सदरील प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) पाच गुन्हे दाखल होणे राज्यासाठी नामुष्कीचे असून शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार पाडला जात असल्याचा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व नुकसानीची भरपाई वसूल करण्यात यावी. तसेच अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांच्या संभाव्य सहभाग असल्याची शक्यता सुद्धा दानवे यांनी वर्तवून चौकशीची मागणी केली आहे. हे ही वाचा… अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू:33 केव्ही वीजतारेचा शॉक लागून अंत, संभाजीनगरातील घटना;VIDEO छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्यावर आज काळाने घाला घातला. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने एका तरुण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा… नागपुरात बारावीचा पेपर फुटला:परीक्षेच्या तासाभराआधीच व्हॉट्सॲपवर केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका, खासगी शिकवणीतील शिक्षकावर संशय राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचे ‘केमिस्ट्री’ आणि ‘फिजिक्स’चे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *