कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ:तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा




राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. लाभार्थी संख्या, आर्थिक भार आधीचा आराखडा : पहिल्या टप्प्यात ५६ लाख शेतकरी समाविष्ट होते. त्यासाठी ३३,५८५ कोटींच्या निधीची तरतूद केली गेली होती.
नव्याने झालेली वाढ : नव्या निकषांनुसार लाभार्थींच्या संख्येत १२ लाखांची भर. राज्य तिजोरीवर ४,४०० कोटींचा अतिरिक्त भार.
सुधारित विस्तार : लाभार्थी संख्या ६८ लाखांवर. निधीचा बोजा ३७,९८५ कोटी रुपयांवर गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *