![]()
डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणारी आणि त्यांची लूटमार करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बदनामीच्या भीतीचा अस्त्र म्हणून वापर करत, या टोळीने अनेक तरुणांना आपला शिकार बनवले आहे. मात्र, नुकत्याच एका पीडित तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे विजापूर नाका पोलिसांनी या टोळीतील 5 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात बदनामी होईल, या दहशतीखाली अनेक तरुणांनी अन्याय सहन केल्याचे वास्तवही समोर आले. कसा चालतो हा ‘हनीट्रॅप’ तरुणांना आकर्षित करणाऱ्या डेटिंग ॲप्सवर ही टोळी आकर्षक फोटोंसह बनावट खाती उघडते. इ-मेल किंवा फेसबुकद्वारे सहज जोडल्या जाणाऱ्या या ॲप्सवर तरुणांशी संपर्क साधला जातो. सुरुवातीला गोड चॅटिंग करून विश्वास संपादन करायचा आणि जवळीक वाढल्यावर त्यांना ठरवून एखाद्या निर्जन ठिकाणी भेटायला बोलवायचे, ही या टोळीची पद्धत आहे. ठरलेल्या ठिकाणी शिकार पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेले टोळीतील इतर सदस्य त्याला गाठतात. शारीरिक छळ करतात. बेदम मारहाण करून बदनामीची धमकी देतात. रोख रक्कम, मोबाईल आणि मौल्यवान हिसकावून घेतल्या जातात. बदनाम होण्याच्या भीतीने पीडित झालेल्या प्रकाराची कुठेच वाच्यता करत नाहीत म्हणून टोळीचे फावत असल्याचेही दिसून येते. घटना 1 : विजापूर रोड परिसरातील एक एकलकोंडा तरुण विरंगुळा म्हणून डेटिंग ॲपवर गेला. त्याला जाळ्यात ओढून निर्जन स्थळी बोलावण्यात आले. तिथे दबा धरून बसलेल्या टोळीने त्याला बेदम मारहाण केली. पैसेही लुटले. घटना 2 : दीड वर्षापूर्वी सात रस्ता परिसरात एका पीडित तरुणाला एका मद्यपीने गाठले. संवादाचा बहाणा करून त्याने त्या तरुणाचा मोबाईल आणि पैसे लुटून पोबारा केला. झालेला प्रकार उघड होईल, या दबावाखाली तरुणाने पोलिसांत जाणे टाळले. डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणारी आणि त्यांची लूटमार करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बदनामीच्या भीतीचा अस्त्र म्हणून वापर करत, या टोळीने अनेक तरुणांना आपला शिकार बनवले आहे. मात्र, नुकत्याच एका पीडित तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे विजापूर नाका पोलिसांनी या टोळीतील 5 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात बदनामी होईल, या दहशतीखाली अनेक तरुणांनी अन्याय सहन केल्याचे वास्तवही समोर आले. अखेर ‘त्या’ तरुणाने तोंड उघडले अन् 5 जणांना झाली अटक अशा अनेक दबलेल्या घटनांनंतर आठवड्यापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणासोबत असाच प्रकार घडला. बदनामीच्या भीतीला न जुमानता या तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि धाडसाने तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. या लुटारू टोळीचा शोध घेत 5 जणांना अटक केली. त्यांची रवानगी थेट कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
दिव्य मराठी एक्सपोझ:डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात ओढून तरुणांचा शारीरिक छळ, लूटही, ‘शिकार’ हेरण्यासाठी साेलापुरात टोळी सक्रिय
