[ads1]
![]()
हिंगोली शहरातील तोफखाना भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये दोन कारसह 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शनिवारी ता. 19 दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसायावर छापे टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, जुगार अड्डे, गुटखा विक्री होत असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. हिंगोली शहरातील तोफखाना भागामध्ये दोन कार मध्ये गुटख्याची पोती भरून त्याचे वितरण होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार, जमादार गजानन पोकळे, नरेंद्र साळवे, पांडुरंग राठोड यांच्या पथकाने शनिवारी ता 19 पहाटेच्या सुमारास तोफखान तोफखाना जाऊन छापा टाकला. मात्र पोलीस येत असल्याचे लक्षात येतात घटनास्थळावरून दोघाजणांनी पळ काढला. दोन कारमधून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या दोन कारची तपासणी केली असता यामध्ये चार लाख रुपये किमतीची गुटक्याची पोटी आढळून आली. यामध्ये विमल पान मसाला, राजसी परंपरा या गुटख्याचा समावेश आहे. पोलिसांनी गुटखा व दोन कारसह 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणला. याप्रकरणी जमादार नरेंद्र साळवे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकरम बेग, सय्यद अन्वर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान फरार असलेल्या दोघांचा पोलिसांनी शोध सुरू केला असून त्यांच्या अटकेनंतरच त्यांनी सदरील गुटख्याची पोती कोठून खरेदी केली होती तसेच कोणाला विक्री केली जाणार होती याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसारच पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
[ads2]
हिंगोलीत दोन कारमधून 16 लाखांचा गुटखा जप्त:स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
















Leave a Reply