![]()
पुणे शहर पोलिस दलातील ३० पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) याबाबतचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये विविध पोलिस ठाण्यांमधील आणि विभागांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये जयंत राजुरकर (गुन्हे, सहकारनगर ते समर्थ पोलिस ठाणे), राघवेंद्रसिंह क्षीरसागर (कल्याण ते उत्तमनगर), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते सिंहगड पोलिस ठाणे), मारुती पाटील (वाहतूक नियंत्रण विभाग ते येवलेवाडी पोलिस ठाणे), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर पोलिस ठाणे), नंदकुमार गायकवाड (पर्वती पोलिस ठाणे ते वाघोली पोलिस ठाणे) यांचा समावेश आहे. तसेच, मनिषा पाटील (मार्केटयार्ड ते लोहगाव पोलिस ठाणे), विश्वजीत जगताप (लोहगाव ते मार्केटयार्ड पोलिस ठाणे), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखा ते पर्वती), महेश बोळकोटगी (शिवाजीनगर ते वारजे माळवाडी पोलिस ठाणे), उमेश गित्ते (समर्थ ते गुन्हे लक्ष्मीनगर पोलिस ठाणे), मोहन खंदारे (उत्तमनगर ते आर्थिक गुन्हे शाखा) यांची बदली झाली आहे. दिलीप दाईगडे (सिंहगड ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडी ते गुन्हे शिवाजीनगर), युवराज हांडे (वाघोली ते गुन्हे शाखा), विश्वजीत काईगडे (वारजे माळवाडी ते गुन्हे शाखा), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे (गुन्हे शाखा ते गुन्हे, सहकारनगर पोलिस ठाणे) यांना नवीन पदस्थापना मिळाली आहे. याशिवाय, निलेश बडाख (गुन्हे, वारजे माळवाडी ते गुन्हे मुंढवा पोलिस ठाणे), पल्लवी मेहेर (गुन्हे, येरवडा ते गुन्हे, वाघोली पोलिस ठाणे), नितीन भोयर (गुन्हे, सिंहगड रोड ते विशेष शाखा), जितेंद्र कदम (गुन्हे शाखा ते कल्याण शाखा), सुनिता नवले (गुन्हे, मार्केटयार्ड ते गुन्हे, येवलेवाडी पोलिस ठाणे), धनंजय पिंगळे (गुन्हे, शिवाजीनगर ते वाहतूक शाखा) आणि गिरीश दिघावकर (लष्कर ते शिवाजीनगर पोलिस ठाणे) यांचाही बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.
पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल:30 पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या, अमितेश कुमार यांनी बजावले आदेश
