प्रा.कैलास पुपुलवाड ह्यांनी केले शिबिरार्थीना मंत्रमुग्ध
नांदेड -‘आई क्रिएशन्स ‘ आणि ‘ सूर्यमुद्रा फाऊंडेशन,नांदेड ‘ आयोजित ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिर ‘ नांदेड च्या सातव्या सत्रात प्रा.कैलास पूपुलवाड( सहयोगी प्राध्यापक,Film and Drama Dept.SRTMU.,सुप्रसिध्द प्रकाश योजना तज्ज्ञ,दिग्दर्शक ) ह्यांनी ‘ नाटकातील प्रकाश योजनेची प्रयोजने, तंत्र आणि उपयोगिता ‘ ह्या विषयावर बोलताना आपल्या खास शैलीत शास्त्रशुद्धपणे आणि सप्रयोग मार्गदर्शन करत सर्व शिबिरार्थीना मंत्रमुग्ध केले.
ह्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ .रवी सरोदे स्वा. रा. ती. म.विद्यापीठाचे उप – कुलसचिव तथा माजी संचालक,परीक्षा विभाग हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गायिका लिंबाबाई कोसरे,ज्येष्ठ प्रकाश योजना तज्ञ अशोक माढेकर,गावकरीचे जिल्हा प्रतिनिधी अशोक काकांडीकर उपस्थित होते.महापुरुष, महामाता ह्यांना अभिवादन केल्यानंतर
मान्यवरांचे स्वागत आनंद कांबळे,तेजाब पाईकराव,अमोल सावंत यांनी केले.त्यानंतर चित्रकार सुनील नेत्रगावकर ह्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी बोलताना डॉ.रवी सरोदे यांनी ‘ सर्व शोषितांच्या न्याय हक्कासाठी आंबेडकरवादी रंगभूमीच्या माध्यमातून गेली ३० वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. विलासराज भद्रे ‘आई क्रिएशन्स,नांदेड ‘ ह्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून करत असलेले कार्य ऐतिहासिक आणि गौरवास्पद आहे.’ असे उद्गार काढले.आभार कृष्णा गजभारे ह्यांनी मानले.
शिबिरास वरचेवर उत्तम प्रतिसाद लाभत असल्याबद्दल समन्वय समितीने समाधान व्यक्त केले.