“गुन्हेगार कितीही लांब पळला, तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच!” हे केरळच्या आयपीएस अधिकारी मेरिन जोसेफ यांनी सत्यात उतरवून दाखवलं आहे. एका नराधमाने १३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्या*चार केला आणि अटकेच्या भीतीने तो चक्क सौदी अरबला पळून गेला. अन्यायाचा डोंगर कोसळलेल्या त्या चिमुरडीने अखेर स्वतःचं आयुष्य संपवलं.🥹😞
तो नराधम परदेशात पळून गेल्यामुळे हे प्रकरण थंड पडेल असं वाटत होतं. पण मेरिन जोसेफ यांनी या केसचा ताबा घेतला आणि त्या बला*त्काऱ्याला भारतात आणल्याशिवाय स्वस्थ न बसण्याची शपथ घेतली.🫡
त्यांनी इंटरपोल आणि सौदी सरकारशी समन्वय साधला. अशा गुन्ह्यांमध्ये प्रत्यार्पण खूप कठीण असतं, पण मेरिन जोसेफ यांच्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झालं.
भारतातून ही ‘शेरनी’ स्वतः सौदी अरबला गेली आणि त्या गुन्हेगाराला बेड्या ठोकून भारतात खेचून आणलं.
पीडितेच्या आत्म्याला शांती: ज्या मुलीने न्यायाच्या प्रतीक्षेत आपला जीव गमावला, तिच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल.
“अशा कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा देशाला अभिमान आहे! IPS मेरिन जोसेफ यांच्यासाठी कमेंटमध्ये ‘जय हिंद’ लिहायला विसरू नका! ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा!”
या रणरागिणीचा पराक्रम जास्तीत जास्त Share करा!
#IPSMerinJoseph #JusticeServed #WomenPower #LadySingham #IndianPolice #BraveHeart #KeralaPolice #JamirKhan #MarathiPost
