नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या जिवंत काडतूसांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 36 जिवंत काडतूसांसह एक पिस्तूल जप्त केले असून मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 8 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 224/2026 अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3, 7 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आरोपी सदरात शौनक गुलाब शिंदे 19 रा. विष्णुपुरी नांदेड,जावेद रहेमत शेख 20 रा. विष्णुपुरी नांदेड,आनंद उर्फ चिन्नू सरदार यादव 24 रा.वजिराबाद नांदेड यांची नवे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 11 मार्च 2026 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास नांदेड ग्रामीण हद्दीत संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 12 मार्च 2026 रोजी पहाटे 2.34 वाजता कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींकडून पिवळ्या व तांब्या धातूचे 36 जिवंत काडतूस (राउंड) तसेच HPM PPU 32 AUTO प्रकारचे पिस्तूल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 1,08,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उप अधिक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक व्यंकट कुसमे,प्रो.पोलीस उप निरीक्षक स्वप्नील साळुंके,पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,मारोती पंचलिंग,सचिन चावरे,समीर अहमद,शंकर माळगे,जमीर शेख,धम्मपाल कांबळे,शेख असिफ,शिवानंद तेजबंद,माधव पालीमकर,विनोद पवार,संजय मेकलवाड यांनी केली. या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत असून आरोपींकडे काडतूस कुठून आले आणि त्यांचा वापर कुठे होणार होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र व्यवहारावर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Post Views: 3
