मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उस्मान
नगर भागात कौडगाव परिसरातील नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ती एका फायबर बोटींमध्ये मध्ये भरून नदीकाठावर आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान भारत बेन्झ कंपनीचे दोन हायवा, टाटा कंपनीचे दोन टिप्पर, दोन पोकलँड मशीन, दोन पोकलेन मशीन,एक इंजिन बोट,एक डंपर,एक फायबर बोट आणि नदीपात्राच्या बाहेर साठवून ठेवलेले 55 ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत 2 कोटी 4 लाख 75 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 53/2026 दाखल करण्यात आला असून भादंवि कलम 303(2), 3(5) तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व खनिज संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कार्यवाहीत आरोपी सदरात कृष्णाजी दशरथ भरकडे,जेजेराव पंडित डोंगरे,उद्धव रामचंद्र भरकडे, मोतीराम जलबा भरकडे,रामदास चांदू उबाळे,मारोती अशोक पुरी,कैलास भद्री पासवान,बळीराम रामजी कल्याणे,सचिन हणमंत भरकडे,चंद्रकांत संजय कदम,केशव एकनाथ भरकडे,ऋषिकेश माधवराव बन,साईनाथ नारायण गिरडे,आकाश राजू गजभारे अश्या १४ जणांची नावे आरोपी सदरात आहेत.
जप्त करण्यात आलेली वाळू व यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन गायकवाड करत आहेत. ठिकाणी पकडलेले काही साहित्य नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी आदींच्या पथकाने केली. दरम्यान, परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले असून पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित कार्यवाहीतील साहित्य नष्ट केल्याचा व्हिडीओ ….
Post Views: 164
