MPत 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय:यूपीच्या 87 गावांना पुराचा धोका; अरुणाचल प्रदेशात पूर-भूस्खलनाची स्थिती




मध्य प्रदेशमध्ये 9 दिवसांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारी बालाघाट, उमरिया आणि डिंडोरीमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने बालाघाट आणि डिंडोरीमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे, तर 31 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढेल. यूपीमध्ये शुक्रवारी वाराणसी, प्रयागराज, गोरखपूरसह 10 शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. यूपीमध्ये नद्यांना पूर येऊ लागला आहे. बलिया आणि बाराबंकीमध्ये सरयू नदी दुथडी भरून वाहत आहे. नद्यांच्या काठावर धूप सुरू झाली आहे. बाराबंकीमध्ये सरयू नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. अनेक गावांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे. 87 गावांवर पुराचे संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा (वेल मार्क्ड लो प्रेशर) आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी 57 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अरुणाचल प्रदेशमध्ये सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची स्थिती अजूनही गंभीर आहे. गेल्या 24 तासांत अपर सुबनसिरी जिल्ह्यातील गिबा, निलिंग, चेतम आणि दापोरिजो सर्कलमधील 35 गावे अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाली आहेत. पुरामुळे आतापर्यंत 1,13,674 लोकांना फटका बसला आहे. राज्यांमधील पावसाचा अलर्ट पहा… देशभरातील हवामानाशी संबंधित चित्रे… देशभरातील हवामानाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचू शकता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *