पराभवाच्या रागातून विजयी उमेदवारावर ‎जीवघेणा हल्ला:अकोटमध्ये पोलिसांचा लाठीमार,‎ भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर जखमी




मनपा निवडणुकीत भाजपच्या ‎‎नवनिर्वाचित नगरसेवकावर ‎प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ‎‎अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री ‎‎नऊच्या सुमारास घडली. शरद‎ श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या ‎‎नगरसेवकाचे नाव आहे. या भागात ‎‎तोडफोड देखील झाली. पोलिसांनी‎ सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे ‎‎शहरात मोठी खळबळ उडाली.‎ जखमी नगरसेवकाला रुग्णालयात ‎‎दाखल करण्यात आले असून‎ उपचार सुरू आहेत.‎ शहरातील प्रभाग क्रमांक 2 ‘ब’‎मधील भाजपचे विजयी उमेदवार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा‎ चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’‎गटातील पराभूत उमेदवार नितीन‎ राऊत आणि समर्थकांनी हल्ला ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केल्याचे सांगण्यात येत आहे.‎ दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या‎ तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य ‎लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात‎ भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार ‎गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला.‎ या प्रभागात तीन जागा //”एआयएमआयएम” ने जिंकल्या, तर एका‎जागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये‎ भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसचे उमेदवाराचा दोन हजार 200 मतांनी पराभव केला.या विजयामुळे प्रभागातील भाजपच्या ‎कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यातूनच भाजपचे‎ नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांची अकोट फैल भागातून रॅली‎ काढण्यात आली. त्यानंतर प्रभागात असताना नवनिर्वाचित नगरसेवक ‎शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. मिळालेल्या‎ माहितीनुसार, भाजप नगरसेवक शरद तुरकर हे सत्कार स्वीकारण्यासाठी ‎एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर भाजपचे पराभूत उमेदवार नितीन‎ राऊत यांच्याकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान, यावेळी वाद ‎चिघळल्याने दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आले होते. यावेळी ‎वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती‎ नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात‎ आल्याची माहिती आहे. शरद तुरकर हे हल्ल्यात जखमी झाले असून,‎त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‎ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित‎ चांडक यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.‎ तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांत ‎गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *