![]()
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयच्या (CSMVS) चिल्ड्रन्स म्युझियमतर्फे ‘म्युझियम्स अॅज क्लासरूम्स: एक्सप्लोरिंग नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ या विषयावरची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी नालंदा लर्निंग सेंटर, CSMVS पार पडली. ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट: अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ या अभ्यास दालनाच्या माध्यमातून संग्रहालयाला एक सजीव आणि प्रभावी वर्गखोली म्हणून नव्याने मांडण्याचा उद्देश या कार्यशाळेचा होता. परस्परसंवादी इतिहास, वस्तू आणि शिक्षणाच्या विविध शक्यतांचा शोध घेत या कार्यशाळेची सांगता झाली. कशासाठी आयोजन? मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयतले चिल्ड्रन्स म्युझियम इतिहास, संस्कृती आणि आधुनिक शिक्षणपद्धतीला जोडण्याचे काम कारते. त्यासाठी विविध प्रदर्शन, कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते. ही कार्यशाळा सुद्धा संग्रहालय आणि शाळांमधील सहकार्य बळकट करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण, चौकशी-आधारित शिक्षण अनुभव विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले वस्तू-आधारित (Object-based) आणि चौकशी-आधारित (Inquiry-led) शिक्षणपद्धतीवर भर देत, विद्यार्थ्यांना संग्रहालयातील वस्तूंशी प्रश्नोत्तर, अर्थलावणे, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे कसे जोडता येते, याचे प्रात्यक्षिक या प्रशिक्षणात दाखविण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) यानुसार अनुभवाधारित व कौशल्याधिष्ठित शिक्षण कसे राबविता येईल, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. समज वाढवण्याची पद्धती कार्यशाळेत अनुभवाधारित व चौकशी-आधारित शिक्षणाची रचना, इतिहास, कला, भूगोल, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांचा आंतरशाखीय समन्वय, तसेच संग्रहालयातील वस्तूंचा प्राथमिक शिक्षणस्रोत म्हणून वापर करून संकल्पनात्मक समज वाढविण्याच्या पद्धती यांचा समावेश होता. याशिवाय NCF मधील इयत्तानिहाय कौशल्ये आणि अभ्यासक्रम विषयांशी संग्रहालय-आधारित शिक्षण कसे संलग्न करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. संग्रहालयांची भूमिका सांगितली दोन तासांच्या या कार्यशाळेत शिक्षक, अभ्यासक्रम विकासक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक अशा एकूण ३० सहभागी उपस्थित होते. ही कार्यशाळा वैदेही सावनल, सहाय्यक संचालक – प्रदर्शने, शिक्षण व सार्वजनिक कार्यक्रम, CSMVS यांनी मार्गदर्शित केली. यावेळी त्यांनी सहभागींसोबत संवाद साधत आधुनिक शिक्षणप्रक्रियेत संग्रहालयांची भूमिका अधोरेखित केली. कार्यशाळेबद्दल शिक्षक म्हणाले… प्राचीन इतिहासाशी संबंधित संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, यावर विचार करण्याची संधी या प्रशिक्षणामुळे मिळाली. हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरला.
– आर्या घोटीकर, प्राध्यापिका, फर्ग्युसन कॉलेज, पुणे म्युझियम क्लासरूम’ ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. इतिहास विद्यार्थ्यांना विविध आणि रंजक पद्धतीने शिकवता येतो, याची जाणीव या कार्यशाळेमुळे झाली.
– धीरज जाधव, कला शिक्षक, पुणे आजची कार्यशाळा आमच्यासाठी अत्यंत अनोखा अनुभव ठरली. इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत या प्रशिक्षणातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
– माया दिवाकर, शिक्षिका इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत नव्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत येथे उपयुक्त माहिती मिळाली. ही कार्यशाळा अनुभवण्यासाठी सुरतहून येणे सार्थ ठरले.
– सुखजित कौर रोहिल्ला, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ हे दालन विद्यार्थ्यांना इतिहास शिकवणे अधिक सोपे करते. प्राचीन भारताविषयी इतक्या व्यापक स्वरूपात माहिती मिळणे ही आमच्यासाठी पर्वणी आहे.
– प्रिया चुघ, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत इतिहास अधिक रंजक आणि संशोधनात्मक पद्धतीने शिकविण्यासाठी येथे मिळालेले मार्गदर्शन आम्ही निश्चितच वर्गात वापरणार आहोत.
– विनीथा गोविंदन, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत
इतिहास माझ्या आवडीचा!:मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडली शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा
