Nagpur Municipal Election Voting Begins January 15 | नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज: पोलिंग पार्ट्या ईव्हीएमसह मतदान केंद्राच्या दिशेने रवाना, उद्या सकाळी मतदान – Nagpur News


नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या असून, उद्या, गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून शहरात मतदान प्रक्रिया सुरू होईल.

.

नागपूर शहरात एकूण ३८ प्रभाग आहेत. यापैकी ३७ प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग तीन सदस्यीय आहे. नागपूरकर एकूण १५१ नगरसेवकांची निवड करणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात सुमारे १६ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, ५ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असतील.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण २४ लाख ८३ हजार ११२ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १२ लाख २६ हजार ६९० पुरुष मतदार, १२ लाख ५६ हजार १६६ महिला मतदार आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे. शांततेत व पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शहरात एकूण ३००४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

यापैकी ३२१ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली असून, तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर असेल. महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक मतदान केंद्र पूर्णतः महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालवले जाईल, ज्यांना ‘पिंक बुथ’ असे नाव देण्यात आले आहे.

तसेच, प्रत्येक झोनमध्ये एक ‘आदर्श बुथ’ तयार करण्यात आला असून, तेथे मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, तर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचे प्रमाण वाढावे आणि सर्व मतदारांना सुरक्षित व सुलभ मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक उपाययोजना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *